गोपिचंद पडळकरांनी बेजबाबदार विधाने करू नयेत, मार्तंड देवस्थानचे स्पष्टीकरण

0

देवस्थानाच्या जमिनी बाबत सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयावरून भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता.पडळकरांच्या या आरोपावरुन आता श्री. मार्तंड देवस्थानाने आपले मत मांडले आहे. जेजुरी येथील श्री. मार्तंड देवस्थानाच्या मालकीच्या जमिनीत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप किंवा ताबा नसून कृपया देवस्थानाच्या कामामध्ये कोणीही राजकारण करू नये, अशा शब्दात श्री. मार्तंड देवस्थानने या जमिनींवर राजकीय ताबा असण्याच्या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या सर्व जमिनी देवस्थानाच्या मालकीच्या असून त्या-त्या गावातील शेतकरी या जागांमध्ये वहिवाटीत आहेत.शोध घेतलेल्या जमिनींबाबत देवस्थान नि:पक्षपातीपणे काम करत आहे.तरी कोणीही राजकीय आकसापोटी बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत.अशी विनंतीदेखील श्री. मार्तंड देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाकडून करण्यात आली आहे.श्री मार्तंड देवसंस्थानाचे प्रमुख विश्वस्त पंकज एकनाथ निकुडे पाटील यांनी सांगितलं आहे की, जेजुरीच्या श्री मार्तंड देवसंस्थाना मालकीच्या खेड तालु्क्यातील चाकण, पुरंदर तालुक्यातील पिसर्वे, इंदापूर तालुक्यातील सणसर व तरंगवाडी,फलटण तालुक्यातील गिरवी व सांगवी आणि सातारा तालु्क्यातील देगाव व लिंब येथे जमिनी आढळून आलेल्या आहेत. या सर्व जमिनी देवसंस्थानाच्या मालकीच्या आहेत.

काही शेतकऱ्यांनी देवसंस्थानाशी संपर्क देखील साधलेला आहे.तसेच, देवसंस्थान हे धार्मिक न्यास आहे, तरी याबाबत कोणीही राजकीय आकसापोटी बेजबाबदार विधाने करू नयेत, अशी विंंनंती त्यांनी केली आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘काका-पुतण्या’असा उल्लेख करत टीका केली आहे. ती बेजबाबदारपणाची असून या प्रकारची विधाने कोणी करू नयेत अशी विनंती मार्तंड देवस्थान समितीने केली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.