गोपीचंद पडळकरांनी केली शरद पवारांवर टीका, अजितदादांनी हाणला जोरदार टोला

0

जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं असून यावरुन राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार होतं. मात्र त्याआधीच भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पहाटे भाजपा समर्थकांसहीत गडावर जाऊन मेंढपाळांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं. काही दिवसांपूर्वीच हा पुतळा उभारण्यात आला असून करोनामुळे मागील वर्षापासून त्याचा अनावरण सोहळा रखडला होता. मात्र पडळकर यांनी पवारांच्या हातून उद्घाटन नियोजित असतानाच स्वत: जाऊन या पुतळ्याचं उद्घाटन केलं.

या उद्घाटनानंतर पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं अनावरण होऊ नये अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती म्हणून आपण छुप्या पद्धतीने या पुतळ्याचं अनावरण केल्याचं पडळकर यांनी सांगितलं. यावरून एकच गदारोळ उडाला असून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पडळकरांना आव्हानच दिलं आहे. ‘उद्या पवार साहेब जेजुरीत येत आहेत, हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं त्यांनी म्हटलं आहे.

‘पडळकरांचं हे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. ज्यांचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांची का एवढी नोंद घेता तुम्ही?,’ असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार यांना पडळकरांच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं त्यावेळी उपस्थित केला.


संभाजी ब्रिगेडने गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे. कोणत्याही महापुरुषांच्या कर्तृत्वाचा इतिहास समाजात रुजविण्यासाठी पुतळे, शिल्प उभे केले जातात. जेजुरी येथे सुद्धा अहिल्याराणी होळकर यांचा पुतळा बसवण्यात येत आहे त्याचे अनावरण राज्य सरकारच्या वतीने अधिकृत केले जाईल. मात्र सत्तेच्या आणि पदाच्या हव्यासा पोटी विरोधाचे विष पिऊन काही तथाकथित गोपीचंद पडळकर सारखे आमदार हे स्टंट करण्यासाठी पुतळ्याचे अनावरण करतात, हा त्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा सुद्धा अवमान आहे. जर सरकार पुतळ्याची स्थापना किंवा अनावरण करणार असेल यांच्या पोटात राजकारणाचे पिल्लू का वळवळ करत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे असं सांगत पडळकरांच्या भूमिकेचा निषेध केला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.