गोकुळचा दबदबा मुंबईत वाढणार – सतेज पाटील

0

गोकुळ निवडणुकीचे बिगुल कोल्हापूर मध्ये जरी वाजले असले तरी आवाज मात्र महाराष्ट्रभर गुंजला. उभ्या महाराष्ट्राचे सर्वाधिक लक्ष हे गोकुळच्या निवडणुकीकडे लागले होते. निवडणुकीची उभ्या महाराष्ट्रात प्रचंड चर्चा सुध्दा झाली. २ मे रोजी निवडणूक संपन्न झाली. काल लागलेल्या निकालामध्ये तीन दशकांच्या पासून असणारी महाडिक यांची निर्विवाद सत्ता संपुष्टात आली.

“आमचं ठरलंय गोकुळ उरलय” असा आवाज कोल्हापुरातून कुस्तीच्या आखाड्यात उतरल्यावर जसा दंड थोपटले की आवाज येतो तसा आवाज घुमला. या महाडिकांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे काम केले ते म्हणजे आमदार श्री हसन मुश्रीफ यांनी आणि सतेज पाटील यांनी. गोकुळच्या २१ जागांपैकी १७ जागा मिळवत सतेज पाटील गटाने ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर घडवून आणले आहे. सत्ताधारी महाडिक गटाला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

सर्व मतदारांचे डोके टेकवून आभार मानत असताना सतेज पाटील म्हणाले “निवडणुका संपल्यात, कोणी काय केले याऐवजी आम्ही काय करणार याकडे लक्ष देणार आहे. आता आमचा नवा अजेंडा आहे. मुंबईत गोकुळचा दबदबा वाढवणार असून शेतकऱ्यांना २ रुपये दर वाढवून देणार आहोत. निवडणुकीत दिलेले आश्वासन मागे पडणार नाही”. आश्वासन पूर्ती केली जाईल असा त्यांनी सर्व मतदारांना विश्वास दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.