
हार्ट अटॅक येण्याची ही ६ लक्षणे आढळताच त्वरित जवळचा दवाखाना गाठा
धावत्या जगात आपले राहणीमान बदलेले असून जीवनशैलीतही फरक पडला आहे. व्यायामाचा अभाव, फास्टफूडचे सेवन याने रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढत आहे. तसेच स्ट्रेस, ताण तणाव रक्तदाबाला निमंत्रण देतो. या सर्वांची परिणीती हार्ट अटॅकमध्ये होते. सध्या तरुणाईतही हा विकार आढळत आहे. हार्ट अटॅकमध्ये त्वरित औषधोपचारांना प्राधान्य द्यावे लागते. संशोधनाअंती हे सिध्द झालेले आहे की, हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही सौम्य लक्षणे आढळतात. ही लक्षणे आढळताच त्वरित नजीकचा दवाखाना गाठा औषधोपचार करून घ्या.
१) छातीत दुखणे, सौम्य वेदना किंवा ठराविक प्रकारच्या वेदना उदा. अंघोळ, जेवण करताना छातीत दुखणे, चालणे, जीना चढणे, सायकलिंग करणे यांमुळे छातीत अचानक दुखू लागल्यास तो हार्ट अटॅक आहे.
२) उलटी, मळमळ, चक्कर झाल्यास पित्त म्हणून दुर्लक्ष न करता दवाखान्यात उपचार घ्या.
३) हार्ट अटॅक येतेवेळी रक्तप्रवाह बंद होतो. त्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा न झाल्याने चक्कर येते व व्यक्ती बेशुध्द होते अशा स्थितीत लगेचच दवाखान्यात न्यावे.
४) छातीत जड वाटणे, छातीवर दाब येणे, डाव्या हातात मुंग्या येणे, दम लागणे, श्वास घेण्यात अडथळा येणे. अशी लक्षणे हार्ट अटॅकची असू शकतात.
५) श्रम न करता घाम येणे, अस्वस्थता, चेहरा फिका पडणे, छातीत धडधडणे, भीती वाटणे, गुदमरणे ही हार्ट अटॅकची लक्षणे आहेत.
६) अचानक डोक्यात घणाचे घाव घातल्याप्रमाणे दुखणे, हाता पायात मुंग्या आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
निरामय निरोगी जीवन जगण्यासाठी सकस आहार, व्यायाम, ताणमुक्त आनंदी आयुष्य असणे गरजेचे आहे. शरीर हे देवाने दिलेली सुंदर देणगी समजून तिची निगा राखा व निरामय आरोग्यपूर्ण जीवन जगा. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.