कामाची गती पाहता आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच स्वप्न लवकरच पूर्ण होईल, शरद पवारांकडून क्रीडा विभागाचे कौतुक!

0

देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महाराष्ट्र सरकारने जो आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ पुण्यातील बालेवाडी येथे उभारले जाणार आहे. या ठिकाणची पाहणी केल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी क्रीडा मंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या.

या विद्यापीठाच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना क्रीडा क्षेत्रात कडे वळण्यास वाव मिळणार आहे तसेच क्रीडा क्षेत्राच्या संबंधित रोजगाराच्या नवीन संधी या विद्यापीठाच्या माध्यमातून निर्माण होणार असल्याची माहिती मिळत आहे. या माध्यमातून जुन्या खेळाडूंना देखील संधी मिळेल तसेच या क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक संधी जुन्या खेळाडूंना नवे दालन उघडे होईल.

शरद पवार म्हणाले की “शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडीच्या माध्यमातून या विद्यापीठाला सुंदर परिसर मिळेल. स्पोर्ट सायन्स, स्पोर्ट टेक्नॉलॉजी, स्पोर्ट कोचिंग अँड ट्रेनिंग याचे अभ्यासक्रम पहिल्या टप्प्यात सुरू केले जात आहेत. 400 कोटी रुपये या विद्यापीठासाठी मंजूर केलेले आहेत, या कामाला गती देण्याची भूमिका पाहता लवकरच स्पोर्ट युनिव्हर्सिटी चे स्वप्न पूर्ण होईल यात काही शंका” असे त्यांनी संगितले.

महाराष्ट्र राज्याची क्रीडा विषय कामगिरी या विद्यापीठाच्या माध्यमातून अधिकाधिक उंचावणार आहे. तसेच क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्री स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घेतली जाणार आहेत. तसेच तरुण वर्गाने क्रीडा क्षेत्रात येण्यासाठी व्यावसायिक दृष्टीने प्रोत्साहन मिळावे हा महाराष्ट्र राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ निर्माण करण्यामागचा हेतू असल्याचं क्रीडामंत्री सुनील केदार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.