
” त्यांना काही डोक आहे का ?, आम्ही यांना सोडणार नाही. ” गिरीश महाजन यांचा सज्जड दम, मविआ आणि भाजपमधील वाद पेटला.
एखाद्या शासकीय कार्यालयात जाऊन 125 तासांचं रेकॉर्डिंग करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली होती.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकास आघाडीतर्फे भाजप नेत्यांविरोधात कुभांड रचले जात असल्याचा गंभीर आरोप काल केला. यासाठी त्यांनी तब्बल 125 तासांचं व्हिडिओ फुटेजदेखील सादर केलं. या व्हिडिओतील काही धक्कादायक संवाद त्यांनी विधानसभेत सादर केले. या सर्व प्रकाराची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या व्हिडिओत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचंही नाव आहे.
अशा एजन्सी फक्त भारत सरकारकडे – शरद पवार
देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या व्हिडिओविषयी बोलताना शरद पवार म्हणाले होते, ‘ ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलो नाही. मी कौतुक वाटलं एका शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन त्याच्या संबंधीत १२५ तासांची रेकॉर्डिंग हे करण्यासाठी फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले ही कौतुकास्पद बाब आहे.125 तास रेकॉर्डिंग करायचं याचा अर्थ ही प्रक्रिया किती तास चालली असेल याचा हिशोब केला तर ही कौतुकास्पद बाब आहे. 125 तास रेकॉर्डिंग काम करण्याचं काम खरंच असेल तर शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा एजन्सी या फक्त भारत सरकारकडे आहेत. त्यामुळे राज्यात जाऊन राज्यात जाऊन राज्य सरकारच्या एखाद्या कार्यालयात जाऊन तास न् तास जे काही काम केलं टेप केलं रेकॉर्ड करायला ते यशस्वी झाले ते खरं आहे की नाही ते सिद्ध झालं पाहिजे असं शरद पवार म्हणाले होते.
भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी या निकालावर आपलं मत व्यक्त केले, यावेळी माध्यमांनी त्यांना शरद पवारांनी 125 तास रेकॉर्डिंग संबंधित दिलेल्या प्रतिक्रियेवर विचारताच त्यांनी ‘त्यांना काही डोकं आहे का? त्यात रेकॉर्डिंग वर्षभराचं देखील मिळतं आणि आम्ही यांना सोडणार नाही अशी थेट धमकी देऊन टाकल्याने भविष्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि भाजपमधील वाद पेटण्याची शक्यता आहे.
रेकाॅर्डींग बद्दल
महाराष्ट्रनामाने यापूर्वीच म्हटले होते की ते संपूर्ण रेकॉर्डिंग कार्यालयातील CCTV कॅमेरा मधील असावे असे दिसत होते. त्याचा स्ट्रिंग ऑपरेशनशी कोणताही संबंध नसावा. तसेच कार्यालयातील व्यक्तीकडून आणि CCTV सर्व्हिस प्रोव्हायडरला हाताशी धरून हा जुना व्हिडिओ डेटा मुख्य स्टोरेज सर्व्हरवरून मिळवला असावा. आणि तसेच स्पष्ट संकेत गिरीश महाजन यांच्या आजच्या वक्तव्यातून जवळपास मिळाले आहेत.