गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो, एकनाथ खडसेंचा फोन वरील संवाद व्हयरल !

0

माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सध्या पश्चिम बंगाल येथील निवडणुकीत व्यस्त होते. त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील वडगांव बुद्रुक या गावात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावात पाणी नसल्याने एका मुलाने थेट राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते एकनाथ खडसे यांना फोन करून तक्रार केली आहे. मात्र या दोघांचा संवाद हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या संवादात जामनेर तालुक्यातील वाकोद जवळचा वडगाव बुद्रुक ला पाणी नाही असं मुलगा यावर खडसे बोलतांना –

कसं काय पाणी नाही तुझा आमदार कुठं मेला ?

का…?

आमदार काय करतोय गिरीश… इकडे तिकडे बायकांमागे फिरतोय निस्ता …

आमदार फोन उचलत नाही असं समोरील मुलगा सांगतांना खडसे पुढे म्हणतात. की पोरींचाच फोन उचलतो.

असा वादग्रस्त फोन वरील संवाद आहे.

या बाबतीत मॅक्स महाराष्ट्राच्या पत्रकारांनी एकनाथ खडसे यांच्याशी या संदर्भात संवाद साधला असता ते म्हणाले की हा आवाज माझाच आहे. मात्र आमचा संवाद हा खानदेशी भाषेत आहे. मतदारसंघात सगळीकडे पाण्याची बोंबाबोंब, लोकांचा हा रोष आहे. तीव्र भाषेत रोष व्यक्त केला असल्याचे त्यांनी सांगितले!

Leave A Reply

Your email address will not be published.