महिला सरपंच आणि महिला ग्रामसेवक यांच्यात फ्री स्टाईल मारहाण : भंडाऱ्यातील घटना!

0

गावाच्या विकासासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांनी एकत्रित येऊन, समन्वय साधून काम करणे गरजेचं असते. सर्वांच्या विचारांनी निर्णय घेत गावाच्या विकासाची दिशा ठरवली जाते. ग्रामपंचायत मध्ये सरपंच आणि सदस्य यांच्या मध्ये समन्वय नसल्याचे दिसून येते मात्र ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या मध्ये समन्वय नसल्याने भांडण झाल्याचे समोर आले आहे.

भंडारा जिल्ह्यातील सिलेगावमध्ये ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच आणि महिला ग्रामसेवक यांच्यात जोरदार भांडण झालं आहे. शिव स्वराज्य दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायती मध्ये कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या ठिकाणी घरकुल ठरावाच्या प्रोसेंडिंगवरून हे भांडण सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. महिला सरपंच संध्या पारधी यांनी ग्रामसेवक मंजुषा शहारे यांच्या जावळील प्रोसिडिंग घेऊन जात असताना ग्रामसेवक व इतर सदस्यांनी सरपंच यांना अडवण्याचा प्रयत्नही केला. तेवढ्यातच धक्काबुकी झाली आणि त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले.

हा व्हिडिओ एका अज्ञात व्यक्तीने काढला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार फिरत आहे. या व्हिडिओ मध्ये सरपंच आणि ग्रामसेवक एकमेकांना जोरदार मारताना दिसून येत आहेत. या प्रकरणी सिहोरा पोलिसात एका दुसऱ्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याचा तपास करीत आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.