दिवसभराचा थकवा, कमजोरी पळवा दूर भूक वाढवून व्हा तंदूरस्त

0

दिवसभराचा थकवा संध्याकाळी जाणवतो किंवा अशक्तपणा येतो. कमजोरी जाणवते तसेच प्रौढ किंवा वयस्कर माणसाना पूर्वी कष्ट केलेल्या लोकांना थकवा, कमजोरी जाणवते अशा सर्वांसाठी तसेच लहान मुलांनाही जर भूक लागत नसेल तर पुढील घरगुती आर्युवेदिक उपाय करून बघा.

साहित्य :
गावठी लसूण – ११ पाकळ्या
लिंबू – १
वेलदोडा – १
पाणी – अर्धा लिटर
कृती :
अर्धा लिटर पाणी गॅसवर गरम करत ठेवा त्यात ११ लसूण पाकळ्या ठेचून टाका. पाणी दोन मिनिट उकळा. आता वेलदोडा सालासकट वाटून घाला आणि पाणी किमान पाच मिनिट उकळा. उकळलेल पाणी साधारण १ ग्लास करा. हे पाणी गाळा व त्यात १ लिंबाचा रस पिळून घाला. आता या पाण्याचे तीन समान भाग करा. पहिला भाग पाणी सकाळच्या नाश्त्यानंतर प्या. दुसरा भाग पाणी दुपारच्या जेवणानंतर प्या. तिसरा भाग पाणी रात्रीच्या जेवणानंतर प्या. हा उपाय तुम्हाला १५ दिवस करायचा आहे. तुमचा थकवा, कमजोरी निश्चितच दूर होईल. लहान मुलांना भूक लागत नसल्यास त्यांना हेच पाणी तीन भागात दोन चमचे द्या.

या पाण्याने भूक लागून वजन वाढण्यास मदत होते. तसेच दिवसभराचा थकवा व कमजोरी दूर होते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.