que es cuckold tinder hack 2020 tinder badoo concepcion tinder cerrar sesion

४ सोपे घरगुती उपाय करून काळ्या मानेपासून मिळवा ५मिनिटात मुक्ती

0

सौंदर्याच विचार करता उजळ बाकदार मान कौतुकास्पद ठरते, परंतू खुपवेळा मान काळी पडते. चेहरकयापेक्षा मान काळी दिसते. बरेच व्यक्ती यासाठी साबण लावून रोज मान घासतात परंतु याने मानेवरचे डाग जाण्याऐवजी मान लाल होते. काळी मान ही सर्वसामान्य समस्या असून मानेवर घाम येऊन त्यात धूळ बसून राप बसतो परिणामी मान काळी पडते. मान, गळा यांना चेहराबरोबर महत्व द्यावे लागते त्यामुळे घाम कमी यावा याची काळजी घ्यावी. मानेवरचे काळे डाग घालवण्याचे ४ घरगुती उपाय आज आपण बघणार आहोत

१) बेकींग सोडा – साधारण अर्धा चमचा बेकींग सोडा घ्या त्यात १ चमचा पाणी घाला घट्ट लेप तयार करा. हा लेप मानेला लावा व दहा मिनिटांनी धुवून टाका. बेकींग सोड्यामुळे त्वचेची रंध्र मोकळी होऊन काळे डाग निघून जातात. आठवड्यातून ४ वेळाहा उपाय करा.
२) बटाटा रस – बटाटा हा नैसर्गिक ब्लिच असून त्याने त्वचेचा काळेपणा दूर होऊन रंग उजळतो. बटाट्याचे काप डोळ्यावरठेवल्यास डोळ्याखालची काळी वर्तुळदूर होतात. बटाटा खिसून घेऊन त्याचा रस मानेला लावल्यास मानेचे ब्लिच होऊन रंग उजळतो.
३) लिंबू + मध – अर्धा लिंबू रस + मध मिसळून अंघोळीच्या आधी अर्धा तासमानेला लावा व मान धुवून टाका.

४) कच्ची पपई – कच्ची पपई + गुलाब पाणी +दही १चमचा कच्ची पपई खिसून घ्या त्यात १चमचा गुलाब पाणी, १ चमचा दही मिसळून मिक्स करा आणि तो लेप मानेला लावा अर्धा तास ठेवा नंतर धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. महिन्यात काळे डाग दूर होतात.
रंग उजळण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो तसेच काॅस्मेटीकही वापरतो. तर हे घरगुती उपाय आवडले असतील तर नक्की रिप्लाय द्या.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.