मुकेश अंबानींच्या घराजवळ जिलेटीन कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवणारा सापडला.

0

दिनांक 26 फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईस्थित अँटिलीया निवास स्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली हिरवी स्कॉर्पिओ मोटार सापडली होती.ही गाडी कोणी ठेवली याचा कसून शोध सुरू होता.या सर्व प्रकरणात सचिन वाझे या पोलिस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एटीएस, एनआयए अशा राज्य व केंद्रीय संस्थांकडून चौकशी चालू आहे.या चौकशीत काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

या स्कॉर्पिओत सचिन वाझे यानेच जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवल्याचे समोर आले आहे.हिरव्या रंगाची ही स्कॉर्पिओ गाडी सचिन वाझेच्या खाजगी ड्रायव्हरने मायकल रोडवर पार्क केली होती.25 फेब्रुवारीच्या रात्री मायकल रोडवर पार्क केलेल्या या गाडीत धमकीचे पत्र आणि जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यासाठी सचिन वाझेच पांढरा कुर्ता आणि डोक्याला रुमाल बांधून गेला होता,असे निष्पन्न झाले आहे.दरम्यान ही गाडी मनसुख हिरण वापरत होता ज्याचा मुंब्रा नाल्यात संशयास्पदरितीने बुडून मृत्यू झाला होता.

ही स्कॉर्पिओ 17 फेब्रुवारीच्या रात्री मुलूंड ऐरोली येथे मनसुख हिरणने तांत्रीक बिघाडाचे कारण करत तेथेच सोडली,व गाडीची चावी सचिन वाझेला दिली.सचिन वाझेने ती गाडी स्वताच्या खाजगी ड्रायव्हरला सांगून ठाणे येथील साकेत सोसायटीत पार्क केली.दुसर्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारीला ती गाडी मुंबई पोलिस आयुक्तालयात पार्क करण्यास सांगितले,रात्री पुन्हा ही स्कॉर्पिओ साकेत सोसायटीत पार्क करायला लावली.त्यानंतर ती गाडी तेथेच राहिली.25फेब्रुवारीला ही हिरवी स्कॉर्पिओ याच सचिन वाझेच्या खाजगी ड्रायव्हरने मायकल रोडवर पार्क केली.या सर्व हालचालीत वाझे पांढरी इनोव्हा घेऊन ड्रायव्हरच्या मागेच होता त्याने ड्रायव्हरने कार सोडताच त्याला इनोव्हात घेतले.

दरम्यान इनोव्हा गाडीची नंबरप्लेट बदलली तसेच कुर्ता व रुमाल परिधान केला व गाडीत धमकीचे पत्र व जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या.गाडीची नंबरप्लेट,साकेत सोसायटीची सीसीटीव्ही हार्डडिस्क तसेच इतर पुरावे मिठी नदीत फेकून दिले.सचिन वाझेने हे स्वता कबूल केले असून मिठी नदीत फेकलेले सर्व पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.