
पेट्रोल-डिझेल दरवाढीमागे गौडबंगाल, पेट्रोलियममंत्र्याची चौकशी करा : चंद्रकांत खैरे
देशातील महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोल चे आकडे शंभरी पार कधी झाले आहेत, तर डिझेल महागाईचा नवीन विक्रम करत लवकरच शंभरी पार करेल असे वाढते दर फलक पाहून वाटते आहे. देशात सर्वसामान्य नागरिकांचे या महागाईमुळे कंबरडे मोडले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमागे गौडबंगाल असल्याचा आरोप करत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची चौकशी करण्याची मागणी केलीय. सध्या कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना सुद्धा पेट्रोल आणि डिझेल दोन्ही १०० शंभरी पार होत चालले आहे. एवढे पैसे कोठे जातात हे पाहण्याची गरज आहे, असं मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं.
चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत घेतलेला पवित्रा हा रास्त आहे. देशातील नागरिक महागाईने त्रस्त झाले आहेत. लोकांच्या मनातील जनभावना मांडण्याचे काम त्यांनी केलं आहे.