भाजपप्रणीत राज्यातच “मोदी मॉडेल”चा फज्जा – अनंत गाडगीळ

0

२०१४ च्या निवडणुकी अगोदर भारतात चांगलाच गुजरात मॉडेलचा बोलबाला झाला होता.

या मॉडेलच्या जोरावरती भाजप केंद्रात सत्तेत आले. लोकांना गुजरात येथील प्रगती बाबतीत आशादायक स्वप्न दाखविण्यात आले होते मात्र आता हे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. तसेच गुजरात चे मॉडेल सुद्धा आता लोकांच्या समोर उघडे पडले आहे.

कोरोनाची दुसरी लाट देशभरामध्ये पसरली आहे. याचा चांगला तडाखा गुजरातला सुद्धा बसला आहे. गुजरात येथील सरकारने गांभीर्याने यावरती पाऊल न उचलल्यामुळे तसेच बेफिकीर राहिल्यामुळे गुजरात उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत चांगलेच वाभाडे काढले होते. तसेच गुजरातचे “अकार्यक्षम मॉडेल”च आता देशापुढे उघड़ झाले आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील मृतदेहाचे थैमान घातले आहे याची दखल देशातील आणि परदेशातील माध्यमांनी घेतली. त्या ठिकाणी झालेल्या मृत्युचे तांडव फार मोठे आहे. कित्येक मृतदेहांना गंगेत सोडून देण्यात आले तर हजारो मृतदेहावर गंगेच्या किनाऱ्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आला.

उत्तर प्रदेश हे आता “नाथांचे नसून अनाथांचे राज्य” बनत चालले असल्याचे गाडगीळ यांनी उपरोधिकपणे म्हंटले आहे. कर्नाटकमध्ये तर स्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की बेंगलुरु शहरात महापालिकेला एकूण १३ पैकी आता ७ स्मशानभूमी या “कोरोना-मृतांसाठी राखीव” ठेवाव्या लागल्या आहेत. यावरूनच भाजपशासित राज्यांची परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.