गदर-२ येतोय भारतात, पण धक्का बसला पाकिस्तानात..!

0

सन २००१ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. चित्रपटाची क्रेझ अशी होती की, प्रेक्षक ट्रकमध्ये प्रवास करत सिनेमागृहात पोहोचत होते. चाहते आजपर्यंत चित्रपटातील डायलॉग विसरले नाहीत.

या चित्रपटात एका बाजूला भारत आणि पाकिस्तानची फाळणी दाखवण्यात आली होती, तर त्याचवेळी सकीना आणि तारा यांच्या सुंदर प्रेमकथेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. चित्रपटात अभिनेत्री अमिषा पटेल सकीना आणि सनी देओल ताराच्या भूमिकेत होता.

त्याचबरोबर, आता बऱ्याच वर्षांनंतर अमिषा पटेल आणि सनी देओलची सुपरहिट जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अमिषा पटेल आणि सनी देओल ‘गदर’ या सिनेमाच्या सिक्वलमध्ये अर्थातच ‘गदर २’मध्ये एकत्र दिसणार आहेत.

आता या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा त्यांचा मुलगा उत्कर्षसोबत ‘गदर २’ची सुरुवात करणार आहेत.अभिनेत्री अमिषा पटेलने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्टर शेअर केले आहे. ज्यात तिने १५ ऑक्टोबरला होणाऱ्या ‘गदर २’ चित्रपटाच्या घोषणेबद्दल सांगितले आहे. अमिषाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरवर “कथा पुढे जाईल.” असे लिहिले आहे.

यासोबतच पोस्टरवर एक मोठा ‘२’ देखील लिहिलेला आहे. या पोस्टरसह कॅप्शनमध्ये अमिषाने लिहिले की, “तुम्ही या वर्षातील सर्वात मोठ्या घोषणेसाठी तयार आहात का? जाणून घेण्यासाठी उद्या सकाळी ११ वाजता यावर लक्ष ठेवा.”चित्रपटाचा प्रमुख अभिनेता सनी देओलनेही चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

या पोस्टरसह सनी देओलने लिहिले आहे की, “मी उद्या सकाळी ११ वाजता माझ्या हृदयाची खूप जवळची आणि खास घोषणा करेन.” त्याचबरोबर चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनीही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

अमिषा पटेल, सनी देओल आणि अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर त्यांच्या ‘गदर’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची माहिती देताच, त्यानंतर सनी आणि अमिषा यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत चाहते सतत आनंद व्यक्त करत आहेत. एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिले की,

“पुन्हा येत आहे बॉलिवूडचा सर्वात मोठा फायटिंग ऍक्शन सनी देओल.” त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘गदर २… उत्साहित पाजी.’खरंतर हा चित्रपट पुन्हा एकवेळ भारत पाकिस्तान च्या थरारक कहाणी चा वारसा घेऊन येणार असल्याचं सांगत आहेत,त्यामुळे पाकिस्तान मध्ये नक्कीच हडकंप निर्माण झाला असणार की आता या चित्रपटात नेमकं काय होणार..!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.