काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला आहे. बोलत असताना ते म्हणाले की प्रताप सरनाईकांच्या पत्रावरुन महाविकास आघाडीमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये असंही मुश्रीफांनी सांगितलं.

प्रताप सरनाईक यांच्या पत्राच्या नंतर राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मध्यामांच्या मध्ये सातत्याने या विषयी चर्चा सुरू असताना दिसून येत आहे.

सत्तेमध्ये राहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते फोडत आहेत असा आरोप प्रताप सरनाईकांनी केला आहे.त्या बद्दल हसन मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले की “सरनाईकांनी असा आरोप केला असला तरी राज्यात कुठेही तशी परिस्थिती नाही. कोल्हापूर जिल्हापरिषद गोकुळमध्ये शिवसेनेला संधी दिली. काही ठिकाणी स्थानिक प्रश्नावरून कुरबुरी झाल्या असतील याचा अर्थ फोडाफोडी चालली आहे असा नाही. प्रताप सरनाईक यांचं हे कारण जुजबी असावं” असे स्पष्ट मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं.

पत्रकारांनी हसन मुश्रीफ यांना विचारले की सरकार स्थापन होत असताना असा काही करार झालाय का एकमेकांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत, असा प्रश्न विचारल्यावर मुश्रीफ म्हणाले, “काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कार्यकर्ते आम्ही फोडतोच, त्यासाठी आम्हाला फुल्ल परवानगी आहे. परंतु शिवसेनेला हात लावायचा नाही हे आमचं ठरलेलं आहे”

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.