
छत्र्या मोफत दुरुस्त : पुण्यात काँग्रेसचा अनोखा उप्रकम, पुणेकरांची उडाली झुंबड!
पावसाळा आला की जुन्या छत्री खराब झाल्याने लोकांची चांगलीच पंचाईत होते. छत्र्यांची आवश्यकता पावसात चिंब भिजल्या शिवाय कोणाला वाटत नाही. पुण्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्री दुरुस्तीचा चांगलाच उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाला लोकांचा तितकाच जोरदार प्रतिसाद मिळतो आहे.
नादुरुस्त छत्र्या मोफत दुरुस्त करण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी याची पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत. मात्र गोर गरीब लोकांच्या दृष्टीने हा निर्णय फारच महत्त्वपूर्ण असा आहे.
या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल झाले आहेत. हे पोस्टर नेटिझन्ससाठी मोठा चर्चेचा विषय सुद्धा ठरत आहेत. पण पावसाळ्यात छत्री शिवाय पर्याय नाही हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. नवीन छत्री घेण्यासाठी लागणारा अनावश्यक खर्च टाळून; जुनी छत्री दुरुस्त करणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. याच गोष्टीला लक्षात घेऊन काँग्रेसने पुण्यात अनोखा उपक्रम राबविला आहे.