
काँग्रेस पक्षाच्या वतीने १० हजार गरजूंना छत्री चे मोफत वाटप!
काँग्रेस पक्षाने सतत सर्वसामान्य माणसाचा विचार केला आहे. लोकांच्या डोक्यावर पावसाळ्यात मोफत छत्री देऊन, छत धरण्याचे काम सध्या काँग्रेस पक्ष करताना दिसून येत आहे. गरजवंताला मदत म्हणून पुण्यात काँग्रेसने मोफत छत्री दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे, सुरुवातीला टीका झाली मात्र सर्वसामान्य माणसाच्या कडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळं टीका करणारे चांगलेच तोंडघशी पडले आहेत. मोफत छत्री वाटपाचा उपक्रम सुद्धा आता काँग्रेसने हाती घेतला आहे.
काँग्रेस नेते खा.राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त १० हजार छत्र्यांचे वाटप करण्यात येणार. सर्वसामान्य माणसाला मदत मिळावी ही भावना या मागील आहे. पुणे महानगरपालिकेतील कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांच्या प्रभागातील १० हजार गरजू नागरिकांना मोफत छत्र्याचे वाटपाचा कार्यक्रम आज प्रातिनिधिक स्वरूपात संपन्न झाला. यावेळी पुणे शहर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.