खाजगी कोविड सेंटर मध्ये शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखाची गळफास घेऊन आत्महत्या!

0

पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे खाजगी कोविड सेंटर मध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. मायमर या खाजगी रुग्णालयात सोमनाथ हुलावळे (वय 45) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमनाथ हे शिवसेनेत सक्रिय काम करत होते. त्यांची आत्महत्या बहुतांश लोकांच्या मनाला चांगलीच चटका लावून गेली आहे.

१ मे रोजी त्यांना उपचाराच्या साठी संबंधित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृती मध्ये सकारात्मक बदल झाल्याच्या नंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांशी फोन द्वारे संवाद साधला. मात्र त्यांनी अचानक आत्महत्या केल्याने नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र संबंधित व्यक्तीचे नातेवाईक दवाखान्याच्या गलथान कारभारामुळे आमच्या रुग्णाने आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. तसेच रुग्णालयावर कारवाईची मागणी सुद्धा केली आहे. पोलिसांनी तत्काळ दखल घेत गुन्हा नोंद केला आहे. आता पोलीस नेमकी काय अँक्शन घेतात हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे!

Leave A Reply

Your email address will not be published.