माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कोरोनाग्रस्त एम्समध्ये केल भरती

0

देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू असून ही लाट पसरण्याचा वेगही तीव्र आहे.सर्वसामान्य जनतेला कोरोनाचा संसर्ग होत आहेच पण यात राजकीय नेते,उद्योगपती,बॉलीवूड स्टार यांचाही समावेश आहे.गेल्या काही दिवसात अनेक राजकीय नेत्यांचा कोरोनान दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर काहीजण संसर्गबाधित होत त्यातून बाहेर आले आहेत.

कोरोना समाजातील सर्वच आर्थिक स्तरात आढळत असून लक्षणही सर्वच स्तरात सारखी आहेत.गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यात कमीअधिक प्रमाणात गर्दी नियंत्रणासाठी कडक आर्थिक निर्बंध लावण्यात आलेले आहेत.लसीकरण सुरू आहे.नुकतेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या बंगालमधील सर्व सभा रद्द केलेल्या आहेत.

दरम्यान देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना एम्समध्ये भरती केल आहे.मनमोहन सिंग यांच वयही जास्त असल्यान त्यांच्यावर तातडीचे उपचार करण्यात आले आहेत.काही दिवसांपूर्वी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहीत देशात लसीकरण वाढवण्याचा सल्ला दिला होता.देशात किती लोकांच लसीकरण झाल यापेक्षा लोकसंख्येच्या किती टक्के झाल हे पाहण महत्वाच आहे असही त्यांनी स्पष्ट केल.कोरोना प्रतिबंधासाठी ५ टप्पेही त्यांनी सुचवले होते.

सध्या मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर असूनदे शातील हा जागतिक किर्तीचा अर्थतज्ञ लवकरच बरा व्हावा अशी काँग्रेससह सर्व पक्षांच्या नेत्यांनी प्रार्थना केली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.