
भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलीसांची अटक
भाजपचे माजी खासदार यांना गुंडाच्या रॅलीत स्वताच्या वाहनांचा ताफा देण्याच्या प्रकरणावरून अटक झाली असून त्यांची चौकशी झाली आहे.त्यांना न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.खंडणीखोर गुंडाशी खासदार संजय गायकवाड यांचा नेमका संबंध काय? याची चौकशी पोलिस करत असून संजय काकडे काय जबाब देतात याची वाट पाहावी लागणार आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याची तुरुंगातून सुटका झाल्यावर त्याची पुणे,मुंबई हायवेवर जंगी मिरवणूक काढण्यात आली होती.या मिरवणुकीत गाड्यांचा ताफा समाविष्ट होता.या ताफ्यात माजी खासदार संजय काकडे यांच्याही वाहनांचा समावेश होता.या मिरवणुकीन वाहतूक कोंडी उदभवली होती.
एका खंडणीखोर गुंड तुरुंगातून सुटल्याचा भाजपच्या नेत्याला एवढा काय आनंद झाला की,त्यांनी स्वताच्या गाड्या त्याच्या मिरवणुकीत वापरायला दिल्या.तसेच काकडे हे गुंड गजानन मारणे याच्या एवढे निकटवर्तीय कसे?असे प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेले आहेत.