
रमजानसाठी राज्यसरकारने जाहीर केली सूचनासुत्री नियमांच पालन करण्याच आवाहन
राज्यात कोरोनाची वाढती संख्या आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू तसेच लस,रेमेडिसेव्हर,बेड यांची कमतरता जाणून घेत भविष्यातील धोके टाळण्यासाठी राज्यात आज संध्याकाळी 8वाजल्यापासून कलम 144 लागू झाल आहे.राज्यात संचारबंदी लागू झाली असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश निघाले आहेत.
नुकताच गुढी पाडवा पार पडला असून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे.मुस्लिम बांधव या महिन्यात रोजे ठेवतात व अल्लाची आराधना करतात.दरम्यान रोजे सोडण्यासाठी बांधवांकडून सामूहिक भोजन आयोजित केल जात ज्यात हिंदू बांधवांनाही बोलवल जात.
या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना नियमांच पालन व्हाव यासाठी काही सूचनासूत्री जाहीर झाली असून ती मुस्लिम बांधवांनी पाळावी अस आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल आहे.
मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करू नये.आपापल्या घरातच सण साजरा करावा.5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊन सामुहिक मिरवणुका,कार्यक्रम,राजकीय सभा घेऊ नयेत.खरेदीसाठी गर्दी करू नये.दुवा मागण्याचा विधी घरातच पार पाडावा.सोशल डिस्टन्सींग पाळाव,मास्क वापरावा.
अत्यंत पवित्र अशा या महिन्यात एकमेकांना इफ्तारी,सहरीसाठी बोलवताना कोरोना नियमांच पालन करत सणाचा आनंद लुटावा.स्त्रियांनी खरेदीसाठी वारंवार बाहेर पडू नये.रमजानमधील सर्व विधी शांततेत व आनंदात पार पाडले जावे.
रोजे सोडताना मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर फळ,ड्राय फ्रुट खरेदी करतात त्यामुळ गर्दी होण्याची शक्यता पाहता स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशाच पालन कराव.ईदगाह मैदानावर गर्दी करू नये.सर्व धर्मगुरुंनी कोरोना पसरू नये यासाठी लोकांना नियम पाळण्याच आवाहन कराव.