१०० वर्षे निरोगी जगण्यासाठी हा एक नियम पाळा; मरेपर्यंत कोणताही आजार होणार नाही

औषध, गोळ्यांवर होणार नाही खर्च

0

बहुतांशवेळा आपण पाहतो की, ज्येष्ठ वयोवृध्द व्यक्ती अत्यंत निरोगी आणि काटक असतात. आयुष्यात खूप कमीवेळा ती दवाखान्यात जातात. ठणठणीत प्रकृती आणि दिर्घायुष्य याच वरदान त्याना लाभलेल असते. आपण त्यांना त्यांच्या या प्रकृतीचे गुपितही विचारतो. कष्ट उत्तम पचनशक्ती असणारी ही लोक नियमबध्द आयुष्य जगतात. मित्रांनो चला बघूया धावपळीच्या या जगात उत्तम जीवनशैली व एका नियमाच्या आधारे दिर्घायुषी कस व्हाव.

भारतीय परंपरेत आर्युवेदीक उपायांना अनन्यसाधारण महत्व असून या उपायांना जगातही मान्यता आहे. असाच एक उपाय ज्याने तुम्ही फिट राहाल तसेच तुम्हाला त्वचाविकार, सांधेदुखी इ आजार होणार नाहीत. तुम्हाला नैसर्गिक देणगीचा बीनखर्ची उपाय करायचा आहे. ज्यात तुम्हाला शरीराला आवश्यक घटक मोफत मिळतील. संपूर्ण सजीवसृष्टी ज्या तत्वामुळे जीवंत आहे तो सूर्य प्रकाश तुम्हाला घ्यायचा आहे. सूर्य तुम्हाला प्रभात झाल्याची सूचना देतो तसेच वनस्पतींना अन्न निर्माण करण्यात मदत करतो. या सूर्याला भारतीय परंपरेत देव मानले गेले आहे. या सूर्यप्रकाशात अत्यंत समृध्द घटक असून ते सृष्टीचे पोषण करतात. कोवळ्या सूर्यप्रकाशात डी जीवनसत्व असते. तसेच सूर्यप्रकाशाने सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात. त्यामुळे रोज आपल्याला सकाळी सूर्य नमस्कार घालायचे आहेत. सूर्यनमस्काराने सर्वांगाला व्यायाम होतो. श्वसनाचे व्यायाम होतात. सूर्यस्नान केल्याने त्वचाविकार होत नाहीत. परदेशातही लोक बीचवर सूर्यस्नान करतात. उत्तम ऊर्जा देणारा हा सोपा उपाय जरुर अवलंबा.

सूर्यप्रकाश घेण्याची योग्य पध्दत म्हणजे कोवळी सूर्यकीरणे अंगावर घ्यायची आहेत. हिवाळ्यात सकाळी ६ ते ८ तर उन्हाळ्यात सकाळी ५ ते ७ यावेळेत सूर्यप्रकाश अनुभवावा सूर्य नमस्कार खुल्या जागेत घालावेत. सकाळी सूर्यनमस्कार घातल्यास शरीर उत्साही राहते. सूर्यनमस्कार करणार्या ज्येष्ठ व्यक्ती अतिशय निरोगी जीवन जगतात.
मित्रांनो काही विकारात सूर्यनमस्कार प्रतिबंधित केले जातात.परिणामी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सूर्यनमस्कार घाला.

Leave A Reply

Your email address will not be published.