येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा’; अजितदादांचा कार्यकर्त्यांना आदेश

0

महाराष्ट्र मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकाधिक मजबूत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिकाधिक विस्तारित करण्यात येत आहे नवनवीन कार्यकर्ते या संवाद दौरा च्या माध्यमातून जोडली जात आहेत.

कापूस पणन महासंघाचे संचालक तथा जळगाव जामोद कृषी बाजार उत्पन्न समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

या प्रवेश सोहळ्याच्या नंतर जयंत पाटील म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक जागा भक्कम झाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. प्रसेनजीत पाटील यांच्यामागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही यावेळी केले.

या प्रवेश होण्याच्या वेळी बोलत असताना अजित पवार म्हणाले की “आगामी सर्व निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकला पाहीजे अशा जोमाने सर्वांनी कामाला सुरुवात करा” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी उपस्थितांना केले. या वेळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, वरिष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी आमदार उदयसिंग पाडवी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.