पूर परिस्थिती…आणि मदातकार्यासाठी स्वतः पालकमंत्री उतरल्या पाण्यात!

0

पुराच्या परिस्थितीमध्ये लोकांचे जीव वाचवण्यासाठी पाण्याची पर्वा न करता राज्यातील महत्त्वाचे नेते फिल्डवरती जाऊन काम करताना दिसून येत आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.अदिती तटकरे या स्वतः पुराच्या परिस्थितीची माहिती घेत आहेत व सोबतच मदत कार्य शक्य तितक्या वेगाने मिळवून देताना दिसून येत आहेत. संकट समयी त्यांचे मदत कार्य पाहून निश्चित सर्वांनाच कौतुक वाटत आहे.

त्यांनी स्वतः फेसबुक पोस्ट केली आहे की “महाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाड शहर तसेच लगतच्या परिसरात पाणी साचले आहे. याठिकाणी प्रत्यक्षात हजर राहून पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी लगतच्या दासगाव व केंबुर्ली परिसरात साळुंखे रेस्क्यू टिमने पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत सुखरूप ठिकाणी हलविले. नागरीकांना वेळेवर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत”. अशा आशयाची त्यांनी पोस्ट केली आहे.

अशा अडचणीच्या काळात त्या करत असलेल्या मदत कार्य पाहून निश्चित त्यांच्या कामाचे कौतुक वाटते. महाराष्ट्राला अशाच कामदार नेत्यांची आवश्यकता आहे; हीच पोकळी राज्यातील तरुण नेते भरून काढताना दिसून येत आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.