फ्लिपकार्टने राज्यसरकारला दिले व्हेंटिलेटर्स गिफ्ट

0

फ्लिपकार्ट ऑनलाईन विक्री सेवा कंपनीने अल्पावधीतच बाजारपेठेत विश्वासहार्यता निर्माण केलेली आहे. अमेझॉन अमेरिकन कंपनीला फ्लिपकार्ट ही भारतीय कंपनी आपल्या ग्राहकांना सतत वेगवेगळ्या ऑफ  देत असते.याच फ्लिपकार्टने स्वताचे सामाजिक ऋण फेडताना स्वताच्या नावलौकिकाला साजेसा काम केलेल आहे.राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्या वाढत असून संपूर्ण आशिया खंडात महाराष्ट्रात स्फोटक परिस्थिती आहे.महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा स्ट्रेंथ सापडत असून मोठ्या प्रमाणावर कोरोनाची साथ पसरत आहे.

दरम्यान शासन आरोग्य सुविधा वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे.कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध व्हावे यासाठी वेगळे कोरोना सेंटर निर्माण केले आहेत.राज्यात लसीकरणाचा वेगही वाढवला गेला आहे.कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत असून त्यासाठी व्हेंटिलेटर्सची गरज आहे.व्हेंटिलेटर्स अभावी रुग्ण दगावण्याची प्रकरणही राज्यात घडत आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर शाॅपिंग वेब पोर्टल फ्लिपकार्ट आणि गिव्ह इंडिया टीमने राज्याच्या आरोग्य विभागाला 28 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले आहेत.राज्यात निर्बंध कडक केले असून आॅक्सीजनचा वापर 80टक्के आरोग्यासाठी व20टक्के उद्योगासाठी करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती, रजनीश कुमार यांचे आभार मानले व यासंबंधीचे पत्र फ्लिपकार्टचे संचालक डिप्पी वांकाणी यांना सुपूर्त केले.यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे,सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी या व्हेंटिलेटर्सचा उपयोग निकडीच्या उपचारांची गरज असणार्या रुग्णांना होईल असा विश्वास व्यक्त केला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.