
भाजपचे किती नेते मला भेटले याची माहिती घ्या ; अजित पवारांचा गौप्यस्फोट.
महाराष्ट्र सरकार वर विरोधक मोठ्या प्रमाणात टीका करत असताना दिसून येत आहे. या सर्वांच्या टीकेला आज जोरदार असे उत्तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहे.
अजित पवार म्हणाले की चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार नेटवर्क बाहेर आहेत असे आरोप करण्याऐवजी त्यांच्या पक्षाचे किती लोक मला भेटले. किती लोक प्रतिनिधींशी चर्चा केली याची माहिती घेतली असती तर असले आरोप करण्याची हिम्मत झाली नसती.
लोकांवर उपचार व्हावेत म्हणून मुख्यमंत्री, सहकारी मंत्री, लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी माझा सतत संपर्क सुरू आहे. याच बरोबर उद्योग क्षेत्राशी निगडीत चर्चा सुद्धा सुरू आहेत. रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवणे आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देणे हे प्राथमिक गरजेचं आहे या साठी प्रयत्न सुरू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
अशा परिस्थिती मध्ये भाजप नेते राजकारण करत आहेत. त्यांची वक्तव्य राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करून राज्याला अडचणीत आणणारी आहेत. मात्र त्यांनी अशा अडचणीच्या काळात केंद्राकडून मदत आणण्यासाठी प्रयत्न करावेत.