अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांची होणार चौकशी

0

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकून आरोप केल्याने वादग्रस्त ठरलेले गृहमंत्री अनिल देशमुख वारंवार आरोपांच खंडण करत होते.गृहमंत्री देशमुख पब्ज,मॉल,हॉटेल येथून 100 कोटी महिना गोळा असायला लावतात असा सनसनाटी आरोप या पत्रात करण्यात आला होता.या प्रकरणान महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले तापल होत, गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती.या सर्व पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली निप्षक्ष चौकशी व्हावी असे सुतोवाच केले होते.

 

दरम्यान राज्य सरकारने एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे.राज्य सरकारने चौकशीसाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची नियुक्ती केली आहे.या समितीने सहा महिन्यात त्यांचा अहवाल सादर करायचा आहे.

परमवीर सिंह यांनी 20 मार्च 2021 रोजी मुख्यमंत्री व राज्यपालांना उद्देशून पत्र लिहीत गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केले होते.याला ग्राह्य धरत समिती परमवीर सिंह यांनी केलेल्या आरोपांचा कोणताही पुरावा जोडला आहे का? याची चौकशी करण्यात येईल,तसेच सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील आणि सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे परमवीर सिंह यांची बदली झाल्यानंतर गृहमंत्री किंवा त्यांचे कार्यालयीन सहकारी यांनी एखादा गुन्हा केला का याचीही चौकशी होईल तसेच लाचलुचपत यंत्रणामार्फतही गरज असल्यास प्रकरण तपासण्यात येईल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.