फडणवीस व चंद्रकांत पाटलांनी ते व्हेटिंलेटर सुरू करून दाखवावेत; काँग्रेसचे आव्हान

0

केंद्रातील भाजप सरकार नरेंद्र मोदी यांची प्रतिमा संवर्धनाचे काम करत आहे. सध्याच्या कालावधीमध्ये नागरिकांना आरोग्य सुविधांची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने मदत करण्याची आवश्यकता आहे मात्र ही मदत करत असताना निव्वळ राजकीय स्वार्थ समोर ठेवून मदत केलेली आहे. या पाठीमागे नागरिकांना फायदा व्हावा असा काही हेतूने हे आता स्पष्ट झाले आहे.

केंद्र सरकारने मदत म्हणून पाठवलेले व्हेटिंलेटर्स हे खराब आहेत हे सर्वश्रुत झाले आहे. मात्र चुकीवर पांघरूण घालण्यासाठी भाजपचे महाराष्ट्रातील नेते चांगलेच पुढे सरसावले आहेत. या गोष्टी पुराव्यानिशी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मांडल्या आहेत. सोबतच त्यांनी भाजप नेत्यांना व्हेंटिलेटर चालू करून दाखवावेत असे आव्हान दिले.

पीएम केअरमधून दिलेले व्हेटिंलेटर्स हे खराब आहेत. त्या बाबतीत भाजप सारवा सारव करताना दिसून येत आहे. मात्र भाजप चे पितळ उघडं पडलं आहे. १७ मे ला औरंगाबाद शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या अहवालाने केंद्र सरकार तसेच गुजरात भाजपा नेत्यांच्या जवळच्या ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न उघडा पडला

औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाने दिलेल्या उत्तराने केंद्र सरकारच्या कांगाव्याची पोलखोल झाली आहे. जनतेच्या जिवापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा महत्त्वाची वाटणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे व्हेंटिलेटर सुरू करुन दाखवावे, असे आव्हान सावंत यांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.