तापाने आलेला अशक्तपणा आणि कडू झालेले तोंड मिनिटात होईल दूर

0

साधारणत: आपल्याला ताप आला की गोळ्या औषध सुरू होतात दोन ते तीन दिवसात ताप ओसरतो मग तोंड कडू होण, तोंडाची चव जाण, पोट नाजूक होण, अशक्तपणा असे साईड इफेक्ट जाणवू लागतात. काही वेळा खोकलाही कमी येत नाही. अशा सर्व समस्यांवर एक घरगुती रामबाण इलाज आज सांगणार आहे.

या उपायासाठी लागणार साहित्य :

पुदीना पाने ताजी असल्यास १ वाटी, पावडर असल्यास २ चमचे, पाणी दोन ग्लास, मोठी खडी साखर ५ तुकडे

कृती : २ग्लास पाणी घेऊन ते गॅसवर गरम करण्याष ठेवा त्यात पुदीना पाने, खडीसाखरचे दोन मोठे खडे बारीक करून घाला आणि पाणी १ ग्लास होईपर्यंत उकळा. आता हे पाणी गाळा व ज्या व्यक्तीला तोंड कडू होण, अशक्तपणा, पचनक्रिया नाजूक, कफ इत्यादी त्रास होतोय त्याला गरम गरमच घोट घोट प्यायला लावा. पुदीन्यात व्हिटामिन, मिनरल्स, कॅलेरी, मँगेनीज भरपूर असते तसेच पुदीना पोटांच्या तक्रारीवर अत्यंत उपयुक्त आहे. अपचन, पोटदुखी याबरोबरच डायजेस्टीव्ह सिस्टीम सुधारण्यात पुदीना मदत करतो. मोठ्या खडीसाखरेत व्हिटामिन बी१२, खनिजे असतात त्यामुळे एनर्जी वाढून अशक्तपणा दूर होतो तसेच तोंडाला मधुर चव येते. हा काढा गरम पिल्याने अन्ननलिका स्वच्छ होते. कफ दूर होतो. काढा प्यायलावर १ तासभर झोपावे तासा दिडतासात काढा अनूभूती येते. किमान तीन दिवस काढा प्या परिणाम जाणवतो.पुदीन्याची पाने ज्यावेळी ताजी मिळतील त्यावेळी ताजीच घ्यावीत परंतु एरवीसाठी ताजी पाने धुवून, निवडून कॉटन कापडावर सावलीतच पसरावी व वाळवून घ्यावी व त्याची मिक्सरला पावडर करून भरून ठेवावी.

वरील उपाय पूर्णत निर्विष असून कोणताही अपाय होत नाही. हळदीसारखे छोटे घरगुती उपाय आपण नेहमीच करत असतो. परंतु काही उपाय माहीत नसतात, असाच हा एक उपाय जरूर करून बघा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.