
आपण घरात वेगवेगळी झाडे लावतो जी शोभेसाठी, फुलांसाठी किंवा फळांसाठी लावली जातात, वृक्ष हा मानवाला सतत काही तरी देत आलेला आहे. घरात कोरफड, तुळस, बेल यांची झाड आवर्जून लावली जातात. फुलांचे वेलही लावले जातात, सध्या सगळीकडे मनी प्लांट नावाचा वेल लावला जातो हा वेल शुभ समजला जातो तसेच या वेलामुळे घरात पैशाची बरकत होते असे म्हटले जाते. तर हाच मनी प्लांट कसा लावावा चला पाहुया.
मनी प्लांट हा इनर वेल असून याला सूर्यप्रकाशाची गरज लागत नाही. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून याला हिरवी पाने येतात. या वेलाची वाढ वेगाने होते. हा वेल तुम्ही किचन, बेडरूममध्ये किंवा बाहेर गॅलरीत सावलीत लावू शकता. या वनस्पतीच्या वाढलेल्या वेलाची दांडी पाण्यात किंवा मातीत दोन्ही ठिकाणी लागू होते. विशेषतः ही वनस्पती पाण्यात लावली जाते. पाण्यात लावलेल्या या वनस्पतीची वाढ वेगाने होते. पाणी सतत बदलत राहावे.
मनी प्लांट लावणे हे शह समजले जात असले तरी तुमचे कष्ट, प्रयत्न गरजेचे असून त्याला जोड म्हणून असे उपाय केले जातात.