
फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा कोरोना पॉझीटिव्ह
बाॅलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव वाढत असून रणबीर कपूर,आलिया भट्ट यांच्यानंतर खिलाडी कुमार अक्षय कुमार कोरोना पाॅझीटिव्ह आढळला होता.सध्या राज्यात जवळजवळ सर्वच पक्षातील नेते कोरोना संसर्ग होऊन त्यातून बाहेर पडले आहेत,तर काही नेत्यांचा यात दुर्दैवी मृत्यूही ओढवला आहे.कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरश: मेताकुटीला आले आहेत.
कोविड संसर्ग होऊन अनेक जागतिक कारकिर्द असलेल्या युरोपियन कलाकारांचा मृत्यू झाला आहे.तळागाळात कोरोनाची लागण होतेच आहे परंतु हा संसर्ग उद्योजक,कलाकार यांनाही ग्रासत आहे.स्वताची अतिशय काळजी घेणारा असा हा वर्ग कोरोनाचे सगळे नियम काटेकोरपणे निभावतो,सॅनिटायजेशन करतो,यांचा आहारही उत्तम असतो, यांच्या व्यायाम आणि फिटनेसवर तरुणाई फिदा असते तरीही या वर्गात कोरोनान शिरकाव केलेला आहे.
बाॅलीवूडच्या तारकांना देखण बनवणारा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा सध्या कोरोना पाॅझीटिव्ह झाला असून त्यान स्वताच ही बातमी सोशल मिडियावर शेअर केली आहे.मनीष मल्होत्रान डिझाईन केलेला लेहंगा चोली असो की घागरा तरुणींची याला प्रचंड मागणी आहे.त्यान डिझाईन केलेल्या कपड्यांच्या किमंतीही भरभक्कम असतात.खासकरून त्याच वेडिंग कलेक्शन खुपच लोकप्रिय आहे.तर एकंदरीत फॅशन दिवा असणारा मनीष मल्होत्रा सध्या होम क्वारंटाईन झालाय,सगळ्यांना काळजी घेण्याच आव्हान करतोय.वक्त वक्त की बात दुसर काय.