शेतकऱ्यांनी भाजपा आमदाराला चोपले!

0

केंद्र सरकारच्या अन्यायकारक तीन कृषि कायद्यांचा विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे ४ महिन्यांचा अवधी उलटला तरी केंद्र सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचे लक्षात घेऊन शेतकरी संतप्त झाले आहेत. नुकतेच याचे पडसाद पंजाबमधील मलोट येथे उमटले असून याठिकाणी पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या भाजपा आमदाराला शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.

शेतकऱ्यांनी भाजप आमदार अरुण नारंग यांना मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आणि नंतर तोंडाला काळं फासलंय. शेतकऱ्यांच्या क्रोधापासून आमदारांना वाचवण्यासाठी चक्क पोलिसांना पाचारण करावे लागले व त्यांनी मोठ्या शर्थीने आमदाराची शेतकऱ्यांच्या तावडीतून सुटका केली आहे.

अरुण नारंग पंजाबमधील अबोहरमधून भाजप आमदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार अरुण नारंग राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी मलोट येथे आले होते. मात्र, ते येण्याच्या आधीपासूनच संतप्त शेतकरी भाजप कार्यालयात त्यांची वाट पाहत होते. नारंग आपल्या कारने या ठिकाणी पोहचताच शेतकऱ्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला आणि त्यांच्यावर शाई फेकली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या कारलाही काळं फासलं.संतप्त शेतकऱ्यांनी भाजप कार्यालयातील भाजपचे झेंडेही जाळले. शेतकऱ्यांनी भाजप आमदारासोबत इतर दोन भाजप नेत्यांनाही मारहाण केली. त्यानंतर पोलीस पुन्हा भाजप नेत्यांना एका दुकानात घेऊन गेले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.