शेतकरी आंदोलन : २६ जून रोजी देशभरातील सर्व राजभवनांसामोर निदर्शने ; संयुक्त किसान मोर्चाची घोषणा!

0

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात देशभरातून मधून शेतकऱ्यांनी निदर्शने, आंदोलने केली. याच शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणे मध्ये ते म्हणाले की २६ जून रोजी देशभरातील सर्व राजभवनांसमोर निदर्शने केली जाणार आहेत. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास या दिवशी सात महिने पूर्ण होत आहेत.

शेतकऱ्यांनी तब्बल सात महिने संयम दाखवत हे आंदोलन अविरत सुरू ठेवले आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी दिल्लीमध्ये हे आंदोलन सुरू आहे. मध्यंतरी गव्हाच्या काढणीच्या कालावधीमध्ये आणि कोरोनाच्या लाटेमुळे काही दिवस आंदोलनाची धार बोथट झाली होती मात्र आता नव्या जोमाने शेतकरी आंदोलनामध्ये उतरली आहेत.

शेतकरी २६ जून रोजी विरोध प्रदर्शनावेळी विविध राज्यांमधील राज्यभवनाबाहेर निदर्शने करतील व काळे झेंडे दाखवतील. तसेच संयुक्त किसान मोर्चा प्रत्येक राज्याच्या राज्यपालाच्या ला निवेदन देऊन राज्यपालांच्या मार्फत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन पाठवणार आहेत. या दिवसाचे औचित्य म्हणजे हा दिवस शेती वाचवा, लोकशाही वाचवा दिवस म्हणून देखील पाळला जाणार असल्याचं ऑल इंडिया किसान सभेचे इंद्रजित सिंग यांनी सांगितले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.