
शेतकरी, त्याचं कुटुंब शेतात राबल्यानं कोरोना संकटात अन्न धान्य पुरलं, दादा भुसेंचं वक्तव्य, पुरेशा पावसानंतर पेरणीचं आवाहन!
आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रामध्ये जून महिन्यामध्ये पेरणी चा हंगामा सुरू असतो. महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने चांगला पाऊस झाला की लगेच पेरणीला सुरुवात केली जाते; मात्र महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की जो पर्यंत पुरेसा पाऊस होत नाही तो पर्यंत पेरणी करू नका.
कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले की “महाविकास आघाडी सरकारचं धोरण शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे असंच आहे”. तसेच भुसे बोलताना पुढे म्हणाले की “कोरोना संकटकाळात अन्न धान्य कमी पडल नाही कारण शेतकरी आणि त्याचं कुटुंब शेतात राबलं यामुळे ते शक्य झालं. गेल्या वर्षी खतांची मागणी वाढली होती. 90 हजार मेट्रिक टन युरियाचा स्टॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला. युरिया दोन दिवसात उपलब्ध होईल असं नियोजन करण्यात आलं आहे.”
अशी माहिती त्यांनी शेतकरी कार्यशाळेत बोलत असताना दिली.