शरद पवारांवर टीका करणाऱ्या पडळकरांना फडणवीसांची फूस – हसन मुश्रीफ

0

ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वरती भाजपचे गोपीचंद पडळकर यांच्याकडून खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात येत आहे. शरद पवार वयाने ज्येष्ठ आहेत, कार्याने ज्येष्ठ आहेत त्यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत गोपीचंद पडळकर टीका करताना दिसून येतात.

कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर हे शरद पवार यांच्यावर चुकीच्या पध्दतीने आणि त्यांच्या वयाचा मान न ठेवता टीका करत आहेत. त्यांची ही टीका सर्वसामान्य माणसांनासुद्धा चुकीची वाटत आहे. वास्तविक या मागे दुसरे कोणी नाही, तर देवेंद्र फडणवीसच असल्याची शंका येत आहे”. त्यामुळे फडणवीस यांनी पडळकरांना तात्काळ आवरेल पाहिजे असे म्हणाले.

गोपीचंद पडळकर यांचा बोलविता धनी हे देवेंद्र फडणवीस असल्याचा संशय व्यक्त करत हसन मुश्रीफ यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रामध्ये जे राजकीय कुशलतेने सत्तांतर झाले शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकत्रित येत भाजपला शह दिला याचा तर राग शरद पवार यांच्या वरती ती नाही ना अशी शंकाही उपस्थित केली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.