
फडणवीस म्हणाले होते, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, त्याचं काय झालं?
राजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस सध्या सोशल मीडिया वरती आणि राजकीय आखाड्यामध्ये चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की “आमच्या हातात सूत्र द्या, तीन ते चार महिन्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण पूर्ववत करुन देतो, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन”. असे त्यांनी केलेले वक्तव्य सध्या सगळीकडे चर्चेत आहे. यावरती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं तुम्ही फार गांभीर्याने घेतलं. ते म्हणाले होते स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षण सोडवू असं म्हणाले होते. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण दिलं नाही तर संन्यास घेईन म्हणतात, मात्र यापैकी काही झालं नाही”. असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ती टीका केली आहे.
सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
देवेंद्र फडणीस यांच्या वरती शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. महा विकास आघाडी सरकारची यामधूनच एकवाक्यता दिसून येत आहे.