फडणवीसांना सत्तेत येण्याची गरज नाही, त्यांनी केवळ मार्ग सांगावा : जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला

0

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रभरातून आंदोलन करत ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा अशा मागण्या करत आंदोलन केलं.

या आंदोलनात बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की ‘राज्यातील ओबीसींचं आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं. मात्र तरीही महाविकास आघाडी सरकार मोदी सरकारवर खापरं फोडतं. माझ्या हाती सूत्रं दिल्यास ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळवून देईन आणि आरक्षण न मिळाल्यास राजकारणातून संन्यास घेईन,’ अशा आक्रमक पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलेच उत्तर देत निशाणा साधला आहे. जयंत पाटील म्हणाले की ‘ओबीसींना आरक्षण देण्यासाठी फडणवीसांना सत्तेत येण्याची गरज नाही. त्यांनी केवळ मार्ग सांगावा, आम्ही आरक्षणाचा तिढा सोडवतो,’ अशा शब्दांत जयंत पाटलांनी फडणवीसांना नांदेड येथील राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या कार्यक्रमात ते बोलत असताना टोला लगावला आहे. तसेच यावेळी पाटील म्हणाले की, ‘फडणवीस सत्तेत आल्यानंतर आरक्षणाचा प्रश्न सोडवणार आहेत. म्हणजेच सत्तेत नसल्यावर ते काहीच करणार नाहीत. हा फडणवीसांचा दुटप्पीपणा आहे. त्यामुळे ओबीसींना आरक्षण देण्यासाठी फडणवीसांनी सत्तेत येण्याची आवश्यकता नाही. आम्ही सत्ता चालवण्यास सक्षम आहोत. असेही जयंत पाटील या वेळी म्हणाले!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.