देवेंद्र फडणवीस, तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलयं; तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या.

0

देशभरातील कित्येक लोकांचे प्राण कोरोनाने जात आहेत. त्याच बरोबर महाराष्ट्र सरकारला लसीच्या बाबतीत, इंजेक्शन, ऑक्सिजनच्या बाबतीत सापत्न वागणूक केंद्र सरकार देत आहे. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत दुजाभाव केला जात आहे. अशा काळामध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस महाराष्ट्राचे हित विसरून केंद्र सरकारची वकिली करण्यात व्यस्त आहेत. याच गोष्टी वर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

“देवेंद्र फडणवीस, तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपाने माशा मारणे स्पर्धाही भरवावी”! अशा शेलक्या शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्रातील जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या केंद्रात असणारी ताकद वापरून करावा अशी लोकांची धारणा आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.