फेसबुक डेटा लिक – अस तपासा तुमच अकांऊट हॅक झालय का?

0

आठ दिवसांपूर्वी एक सनसनाटी बातमी मिडीयावर फिरत होती ती म्हणजे जगातील असंख्य फेसबुक युजर्सचा डेटा लिक झाला असून भारतातील 60 लाख युजर्सचा वैयक्तिक डेटा लिक झाला आहे.हा डेटा डार्क वेबवर उपलब्ध असून या हॅकमध्ये युजर्सच पूर्ण नाव, ठिकाण,जन्मतारीख,ई मेल आयडी, फोन क्रमांक तसेच रिलेशनशीप स्टेटस या सर्वांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे फेसबुक संस्थापक मार्क झुकेरबर्ग याचाही वैयक्तिक डेटा लिक झाला असून त्यात त्याचा फोन नंबरही आहे.मार्क झुकेरबर्ग स्वता सिग्नल हे अॅप वापरत असल्याच समोर आल आहे.ही माहिती सिक्युरिटी रिसर्चनी ट्विटवर प्रकाशित केली आहे.तुमचही अकांऊट हॅक झालय का ते पाहायच असेल तर https://haveibeenpwned.com या वेबसाइटवर जाऊन तुमचा ईमेल आयडी टाकून पहा.तुमचा डेटा कुठे कुठे हॅक झाला आहे ते कळेल परंतु यासाठी तुमच फेसबुक अकाऊंट ईमेल आयडीने जोडले असाव लागेल जर तुम्ही मोबाईल नंबर टाकून फेसबुक अकाऊंट उघडत असाल तर डेटा लिकची माहिती कळण अशक्य असून त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत अस कंपनीन स्पष्ट केल आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणावर डेटा लिक होऊनही फेसबुकने अजूनही या लीकमध्ये सामिल असणार्या लोकांना नोटीफाय केल नाही.आम्ही एक त्रुटी दूर केली एवढच कंपनी स्पष्ट केलेल आहे.परंतु ज्यांची माहिती चोरण्यात आली त्यांच काय करायच?याच उत्तर कंपनीन दिल नसून दुसऱ्यांना फेसबुक, वॉटसअप वापरायला लावणारा झुकेरबर्ग हा स्वता मात्र सिग्नल अॅप वापरत असल्याच समोर आल आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.