
अजितदादांची मंत्रिमंडळात वाढली पाॅवर – अतिरिक्त भार अजितदादांच्या खांद्यावर
मुंबई : राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापलेल असून सातत्यान घडामोडींना वेग आला आलेला आहे.वाढलेली कोरोना परिस्थिती व त्यावर राज्यात लावलेले निर्बंध या सर्वांमुळे राज्य सरकारवरील ताण वाढला आहे.त्यातच माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकत अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते, त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी लागणार आहे.जयश्री पाटील या कायदे तज्ञांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी देत पंधरा दिवसात अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी अनिल देशमुखांनी राजीनामा दिलेला आहे.
गृहमंत्रीपदाचा राजीनामा अनिल देशमुखांनी दिल्याने त्यांच्या जागी दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे.दिलीप वळसे पाटील सलग सात वेळा आमदार झालेले आहेत.दिलीप वळसे पाटील सध्या कामगार मंत्रिपद व उत्पादन शुल्क सांभाळत आहेत.दरम्यान वळसे पाटलांच नाव गृहमंत्रीपदासाठी निश्चित झाल्याने शरद पवारांनी मंत्रिमंडळ फेरबदल करण्याचे आणखीही काही निर्णय घेतले आहेत.त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क खात्याचा अतिरिक्त भार सोपवला आहे.अजित पवार सध्या अर्थ व नियोजनपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.याबरोबरच वळसेंकडील कामगारमंत्री पद ग्रामविकास मंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांना सोपवण्यात आल आहे.या खांदेपालटामुळे काही मंत्री अतिरिक्त भार स्विकारत आहेत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या बदलाबाबतचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवले आहे.तसेच अनिल देशमुखांचा राजीनामाही अधिस्वीकृतीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आले आहे.