” पर्यवाढीसाठी झटणारा नेता हरपला ” अजितदादा पवार यांच्या शोकभावना व्यक्त

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख असणारे तसेच सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि सर्व समाजघटकांना आपला वाटणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते, असे ‘पुस्तकांचे गाव’ भिलारचे सुपुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे (७२ ) यांचे रविवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने भिलार (ता.महाबळेश्वर) येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.२००४ ते २००८ या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद त्यांनी भूषविले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते १० वर्षे संचालक होते. नियोजन समितीमध्ये नामनिर्देशित सदस्य, स्ट्रॉबेरी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते. पाचगणीत त्यांनी ‘हिलरेंज स्कूल’ स्थापन केले होते. आपल्या जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी शिवजयंतीनिमित्त प्रतापगडावर जिल्हा परिषदेची सभा आयोजित करण्याचा चांगला पायंडा पाडला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ‘बाळासाहेब भिलारे यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा सुसंस्कृत नेता हरपला आहे. महाबळेश्कर-पाचगणीच्या विकासासह पर्यटनवाढीसाठी त्यांनी तळमळीने काम केले. त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्याने कर्तृत्ववान सुपुत्र गमावला असून, राजकीय, सामाजिक चळवळीची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

बाळासाहेब भिलारे यांची प्रकृती गेले काही दिवस बरी नव्हती. त्यातच रविवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर साडेबारा वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. बाळासाहेब भिलारे हे सलग २५ वर्षे भिलार गटाचे जिल्हा परिषद सदस्य होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि सर्व समाजघटकांना आपला वाटणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.