
संभाजीराजे वगळता एकाही नेत्याने मराठा आरक्षणावरून केंद्राला सवाल केला नाही – अशोक चव्हाण
महाराष्ट्र राज्यामधील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्दा चांगला स्थापलेला आहे महाराष्ट्रभरात सातत्याने मोर्चे निघाले आहेत आंदोलने झाली आहेत आरक्षण मिळावा म्हणून वाट्टेल ते प्रयत्न सुरू आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सातत्याने राजकारण होताना दिसून येत आहे आरक्षणाच्या संबंधित भूमिका घेताना फार कमी लोक दिसत आहेत.
महाराष्ट्रामध्ये दोन दिवसाचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनामध्ये विविध विषयावरती चर्चा झाली. दरम्यान आज मंत्री अशोक चव्हाण विधानसभेच्या सभागृहामध्ये बोलत असताना मराठा आरक्षणाबाबत त्यांनी भाष्य केले आहे ते म्हणाले की ‘खासदार संभाजी राजे यांचा एकमेव अपवाद वगळता एकाही नेत्याने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर केंद्राला सवाल केला नाही. केवळ खा. संभाजी राजेंनी समंजस भूमिका घेऊन जे विषय केंद्राकडे आहेत, ते सोडवण्यासाठी केंद्रानेच पुढाकार घेतला पाहिजे,’ असं बोलत असताना ते म्हणाले.
तसेच पुढे बोलत असताना अशोक चव्हाण म्हणाले की “केंद्र सरकारकडे बहुमत असल्याने त्यांनी यापूर्वी अनेक क्लिष्ट विषयांबाबत संसदेत निर्णय घेतले आहेत. त्याचप्रमाणे आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्यासाठी केंद्राने संसदेच्या पातळीवर योग्य सुधारणा करून मराठा आरक्षणासह ५० टक्क्यांवरील देशातील सर्व आरक्षणांचा प्रश्न निकाली काढावा”, अशी मागणी देखील आज अशोक चव्हाण यांनी सभागृहातून केली आहे.