मराठा बांधवांना न्याय व हक्क देण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व केले जाईल – अजित पवार

0

“देशातील अन्य राज्यात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे असतानाही मराठा आरक्षणासंदर्भात त्याचा विचार न होणे हे आकलनापलिकडचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून राज्य सरकार आपली पुढील भूमिका निश्चित करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्यावरून मराठा समाजात स्पष्टपणे नाराजी दिसून येत आहे. या बाबतीत राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने जे नाकारले त्याची भरपाई शक्य त्या सर्व मार्गांनी करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील. मराठा बांधवांना न्याय व हक्क देण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व केले जाईल. त्यांच्या मनातील अन्यायाची भावना दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सरकार करेल सर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारले, त्याची भरपाई राज्य सरकार सर्वतोपरीने करून देणार” असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

महाराष्ट्र राज्य सरकार हे मराठा बांधवांच्या बाजूने सक्षमपणे असल्याचे दिसून येत आहे. शक्य असणारे सगळे प्रयत्न आम्ही करू असे सांगत राज्य सरकार मराठा बांधवांच्या बाबतीत सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.