प्रत्येक विद्यार्थिनी आणि माझ्या विद्यार्थिनी, अंगणवाडीताईंकडे स्वत:च्या हक्काची एक सायकल असावी – यशोमती ठाकूर

0

 

आज जागतिक सायकल दिन सायकल हा सर्वांचा आवडता विषय. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला असता सायकल ही फायदेशीर आहेच; सोबतच पर्यावरणास पण याचा काही तोटा होत नाही. याच निमित्ताने सायकल दिनाच्या निमित्ताने महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांच्या बद्दल सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या “विमान,जहाज, वेगवान चारचाकी-दुचाकी गाड्यांच्या जगात सायकल चं महत्व ते काय?? पण आज या सायकल मुळे अनेक मुली शाळेत जाऊ शकतात, मुलींमधलं शिक्षणाचं प्रमाण वाढायला ही सायकल एक महत्वाचं साधन ठरलीय.

लॉकडाऊन काळातही परिवहनाचं साधन नसल्याने अनेक महिला रोजगारापासून वंचित राहिल्याचे रिपोर्ट आहेत. येत्या काळात सर्व विद्यार्थिनी आणि माझ्या अंगणवाडीताईंकडे इतकं काही नसलं तरी स्वत:च्या हक्काची एक सायकल तरी असावी हे माझं स्वप्न आहे”.

अंगणवाडी सेविकांच्या बद्दल नेमका काय निर्णय घेतला जाणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यांनी “प्रत्येक विद्यार्थिनी आणि माझ्या अंगणवाडीताईंकडे इतकं काही नसलं तरी स्वत:च्या हक्काची एक सायकल तरी असावी हे माझं स्वप्न आहे”. असे म्हणत मनातील इच्छा बोलून दाखवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.