
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पोटदुखीने त्रस्त होते परिणामी त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात अॅडमीट केले गेले,तेथे पित्तशयात खडे आढळल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज स्पष्ट झाली.31मार्चला होणारी ही शस्त्रक्रिया मंगळवारी रात्रीच पवार साहेबांचा त्र2स बळावल्याने करण्यात आली.
राज्यातील सर्व नेते पवार साहेबांच्या प्रकृतीची चौकशी करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पवार साहेबांना लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा दिल्या आहेत.वरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर अजून एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.परिणामी त्यांना दहा दिवस रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे.परंतु अविरत सक्रिया हा ध्यास असलेल्या पवार साहेबांचा एक किस्सा त्यांचे नातू रोहीत पवार यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.
शस्त्रक्रियेदरम्यान पवार साहेबांसोबत सुप्रिया ताई सुळे होत्या.शस्त्रक्रिया पार पडताच काही वेळानंतर पवार साहेबांना रुममध्ये आणण्यात आले.दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर होताच रोहीत पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यांची भेट घेतली.त्यावेळी पवार साहेबांनी आरोग्यमंत्री टोपे साहेबांना पाहताच स्वताच्या प्रकृतीचा त्रास बाजूला ठेवत राज्यातील इतर विषयांसह कोरोना स्थितीची विचारपूस केली.”हॉस्पीटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या या लोकनेत्याला पाहून मी थक्क झालो”असे रोहीत पवार म्हणाले.त्यांनी स्वताच्या फेसबुक पेजवर भावूक होत ही पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी करणार्या डॉक्टर मायदेवसह त्यांच्या सहकाऱ्यांचे सुप्रिया ताईंसह सर्वांनीच मनापासून आभार मानले.