मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यात अज्ञात वाहनाची एंट्री

0

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साकीनाका अत्याचार प्रकरणाबाबत गृहविभागासोबतची बैठक संपवून घराकडे निघाले होते. त्याच दरम्यान एक अज्ञात कार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात शिरली.ही धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. ही एका व्यापाऱ्याची कार असल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणी संबंधित गाडीच्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सुरक्षेसाठी असलेल्या रक्षकांनी त्या अज्ञात वाहन चालकाला ताफ्यातून बाहेर पडण्याचा इशारा केला होता. पण त्याने गाडी थांबवली नाही. पुढे पोलिसांनी तत्काळ या वाहनचालकाला थांबवले आणि त्याची चौकशी केली. त्यानंतर मर्सिडीज चालक मलबार हिल परिसरात राहणारा व्यापारी असल्याचे समोर आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अशाप्रकारे एक अज्ञात वाहन सामील झाल्याने वातावरण गंभीर बनले त्यातच इशारा करूनही ही गाडी ताफ्यातून बाहेर न पडता बाहेर गेली त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे सुरक्षारक्षक अॅक्शन मोडमध्ये आले व त्यांनी ही गाडी बाजूला घेत चौकशी केली व तक्रार दाखल केली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.