शिक्षण थांबू देणार नाही…सुनिल शेळकेंकडून फी सवलतीसाठी ‘इतक्या’ लाखांचे अर्थसहाय्य!

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा मावळ मतदार संघाचे आमदार सुनील शेळके यांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत सकारात्मक पाऊल उचलले आहे मावळ तालुक्यातील विनाअनुदानित शाळेमधील विद्यार्थ्यांना फी सवलत मिळावी म्हणून आमदार सुनील शेळके यांनी फीच्या पाच टक्के रक्कम प्रत्यक्ष योगदान म्हणून तळेगाव दाभाडे येथील तीन शाळांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले.

विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला म्हणून आमदार सुनील शेळके यांचे आभार विद्यार्थी आणि पालक आभार मानताना दिसून येत आहेत. तसेच शिक्षण संस्थेचे चालक सुद्धा त्यांचे आभार मानत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील विनाअनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना 35% सवलत देण्याबाबत 21 जून रोजी झालेल्या समन्वय बैठकीत सर्वानुमते सहमती झाली होती. यावेळी आमदार शेळके यांनी पाच टक्के फीचा भार उचलण्याचे आश्वासन दिले होते.

या आश्वासनानंतर आमदार शेळके यांनी प्रत्यक्ष कृतीतून मावळमधील पालकांना दिलेला शब्द पाळला. दिलेला शब्द पाळला म्हणून आमदार सुनील शेळके यांचे कौतुक होताना दिसत आहे लोकप्रिय आमदार म्हणून त्यांना दिलेली उपाधी ही त्यांच्या आशा कौशल्यामुळे असावे असे निश्चित वाटते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.