दहावी,बारावीची परीक्षा पुढे ढकलली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

0

राज्यात लाॅकडाऊन लागण्याची तयारी सुरू असून फक्त कधी लागणार व किती दिवस लागणार एवढेच प्रश्न बाकी आहेत.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दोन दिवसापासून बैठका घेत असून सर्व पक्षीय बैठक,टास्क फोर्स बैठक पार पडली असून सर्वच बैठकीत लाॅकडाऊनला मान्यता मिळाली आहे,आज मुख्यमंत्री अर्थविषयक बैठक घेणार असून त्यानंतर लगेचच लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे.राज्यात वाढत्या कोरोनाच्या स्थितीमुळ हा निर्णय घेण्यात येत आहे.

 

राज्यात यापूर्वीच 1ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच एमपीएससीची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे.आज लागणार्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांंनी मुख्यमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बैठक केली असून त्यात पालक,शिक्षक तसेच शिक्षण तज्ञांच मत मांडून 10च्या परिक्षेबाबत निर्णय घेतला आहे यानुसार 10वीची परीक्षा जूनमध्ये तर 12वीची परीक्षा मे अखेरला होईल अस त्यांनी स्पष्ट केल.दरम्यान 10 वी 12वीचा गोंधळ दूर झाला असून विद्यार्थ्यांनी साशंकता न ठेवण्याच आवाहन वर्षा गायकवाड यांनी केल.

9 वी आणि 11वीची परीक्षाही होणार नसून विद्यार्थ्यांना स्वाध्यायावर आधारित आॅनलाईन किंवा आॅफलाईन परीक्षा द्यायची आहे.यावरूनच विद्यार्थ्यांचे गुण दिले जाणार आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.