
माजी गृहमंत्र्यावर ED ची धाड, आजी गृहमंत्री म्हणाले की…
माजी गृहमंत्री अनील बाबु देशमुख यांच्या घरावरती सीबीआयने छापा टाकला होता. त्या लागोपाठच ईडीनेही त्यांच्या घरावर छापा टाकला आहे. यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या बद्दल माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की सर्वांचं लक्ष कोरोनाकडे असायला हवं, चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत, असं वळसे पाटील म्हणाले. मात्र पुढे बोलत असताना ते म्हणाले की “मी याबाबत जास्त बोलू इच्छित नाही. संबंधित यंत्रणा तपास करत आहे. चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. सर्वांचे लक्ष कोरोनाकडे असायला हवं. कुणी काहीही मागणी केली तरी चौकशी होत नाही. सीबीआय चौकशीसाठी मात्र राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल” असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
राज्यसरकार ने राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाय योजना अवलंबत आहे. अशा आशयाची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.