खा. अमोल कोल्हे गिरवणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी आणि राष्ट्रबांधणीचे धडे!

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा.अमोल कोल्हे यांनी अभिनेता म्हणून पडद्यावर छत्रपती संभाजी महाराजांची केलेली महाराष्ट्रातील अबाल वृद्धांनी डोक्यावर घेतली. डॉ. अमोल कोल्हे यांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या वरती असलेला अभ्यास हा फार मोठा आहे. आता पुन्हा एकदा शिवरायांच्या युद्ध नीतीच्या बाबतीत अभ्यासाचे वर्ग गिरवण्याचे खा. अमोल कोल्हे यांनी ठरवले आहे.

खा. अमोल कोल्हे यांनी ट्विट करत माहिती दिली की “युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनिती विषयी अधिक जाणून घेण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी आणि राष्ट्रबांधणी’ या विषयात नुकताच सुरू केलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्सला प्रवेश घ्यायचे निश्चित केले”. अशा आशयाचे ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोस्ट गॅज्युएशनचा अभ्यासक्रम हे स्तुत्य पाऊल वाटलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास वाढायला हवा. अनेक तरुणांना महाराजांना जाणून घेता येईल. महाराजांना आणखी जाणून मला ही घ्यायचंय.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की “अर्थव्यवस्था, व्यवस्थापन कौशल्य आणि इतर सर्व जाणून घ्यायचा आहे. त्यासाठी हा अभ्यासक्रम निश्चितच उपयोगी ठरेल. यासाठी मी स्वतः विद्यार्थी म्हणून प्रवेश घेऊ इच्छितो आणि एक शिवप्रेमी म्हणून पाहिजे ती मदत मी करेल.”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती “छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी आणि राष्ट्रबांधणी’ या सुरू केलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्सला तरुणांचा चांगलाच प्रतिसाद मिळणार आहे हे मात्र निश्चित.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.